संथ नीले हे पाणी
वर शुक्राचा तारा
कुरल्या लहरी मधुनी
शील घालतो वारा
मंगेश पाडगावकर (जिप्सी)
तू असतीस तर झाले असते
आहे त्याहुनी जग हे सुन्दर
चांदण्यात विरघलले असते
गगनधरेतिल धूसर अंतर.
मगेश पाडगावकर (जिप्सी)
Thursday, August 26, 2010
Wednesday, August 25, 2010
कुणीतरी आठवणं काढतय
वैभव जोशीकुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......
बाकी काही नाही
हसता हसता डोळे अलगद भरुनही येतील
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......
रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता-जाता
"एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवती भोवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
स्रुष्टीमध्ये दोनच जीव आणखी कुणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......
मोबाईल वाजण्याआधीच तो वाजल्य़ासारखा वाटेल
जुनाच काढून एसएमएस वाचावासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुनं बिबरुनं जाण्यासारखं काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......
जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला सांभाळावे थोडे
सांगुन द्याव काळजीसारख बिलकुल काही नाही
"कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......"

From मनोगत
स्वप्न संपल की सत्य बोचु लागतं उदबत्या जळुन गेल्या तर मागे राखेचा सडा ऊरतो . राखेला सुंगंध नसतो. स्वप्नाला सुत्र नसत. तरी मी त्याला विचारलं "स्वप्नांवर माणुस जगतो का रे ?" तो म्हणाला "नाही ! स्वप्नांवरच माणुस झोपतो, रमतो. पण जाग येईपर्यंत ! जागेपणीही स्वप्नच ऊराशी बाळगली तर परत झोपण्याची वेळ येते माणसावर "
वपु काले
Subscribe to:
Posts (Atom)